नियमित केलेल्या शेतीमालाच्या विक्री व्यवस्थेवर नियंत्रण करण्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समिती सांगोलाची स्थापना 25 जुलै 1960 रोज़ी झाली व 17 जूलै 1962 रोजी प्रत्यक्ष कामकाजास सुरवात झाली. बाजार समितीचे कामकाज महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 च्या कायद्यानुसार चालते. कृषि उत्पन्न बाजार समिती सांगोला मुख्य बाजार असुन उप बाजार महुद बु।। दि. 21मार्च 1985 पासून चालू झालेला आहे. मुख्य बाजाराचे आवार 43 एकर जागेवर व्यापले आहे.मुख्य बाजारामध्ये भुसार व डळीब मार्केट खरेदी विक्रीचे व्यवहार होत आहेत. उप बाजार महुद बु।। येथे भुसार मार्केट असुन तेथे 0.10 आर क्षेत्र आहे.तेथे गोडावून ऑफिस बोरवेल पाण्याची टाकी आहे. बाजार समितीचा मुळ उद्देश शेतक-यांचा शेतमालाच्या खरेदी विक्री व्यवहारात न्याय व्यवस्था प्रस्तापित करणे व त्या अनुंषगांने गरजा पुर्ण करणे व शेतमालास योग्य भाव मिळवून देणे हा उद्देश आहे.
महाराष्ट्राची लक्ष वेधनारी सांगोलाची बाजार समिती शेतक-यांच्या पिकवलेल्या मालाला अधारभुत किंमत मिळावी व उत्पादीत केलेला माल विकता यावा यासाठी शासनाने बाजार समितीची निर्मिती केली सांगोला बाजार समिती महाराष्ट्रात अव्वल स्थानावर आहे. कारण बाजार समितीचे नियोजन व शिस्त या बाबीवर मा.आ.कै.गणपतरावजी देशमुखसाहेब यांचेमुळे बाजार समितीचा व शेतक-यांचा विकास झालेला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात जनावरे खरेदी विक्रीसाठी प्रसिध्द बाजार सांगोला बाजार आवारामध्ये भरतो शेतक-यांना एका छताखाली जातीवंत जनावरे खिल्लार गाय, खोंड, पंढरपुरी म्हैस, संकरीत जर्शी गाय, व शेळ्या मेंढ्याचा बाजार भरत असल्यामुळे शेतकरी व व्यापारी यांना फायदा होत आहे. प्रसिध्द असलेला जनावरांचा बाजार हा दर आठवड्याला शनिवार व रविवार दोन दिवस भरत आहे.या बाजारामध्ये सरासरी अंदाजे उलाढाल 4 ते 5 कोटींची होत आहे.
सांगोला हा तालूका डाळींबासाठी देशात प्रसिध्द आहे. हे डाळींब परराज्यात पाठविले जाते. दररोज डाळींबाची मुख्य यार्डमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीचे व्यवहार होत आहेत. त्यामुळे शेतक-यांच्या डाळींबाला योग्य व रास्त भाव मिळत आहे. परराज्यातील व्यापारी वर्ग हा बाजार समितीकडे अकर्षित होत आहे. बाजार समितीने मुख्य मार्कट यार्डामध्ये शेतकरी व व्यापा-यांसाठी खालील प्रमाणे सुख सोई केलेल्या आहेत. अंतर्गंत डांबरी व सिमेंट रस्ते, शेतकरी व हमाल भवन, विज, स्वच्छता गृहे, जनावरे व शेतक-यांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, शेतक-यासाठी निवारा शेड, डाळीब मार्कट मध्ये लिलाव गृहे, व्यापारी व कर्मशियल गाळे बांधलेले आहेत, भुसार गोडावून शेतक-यांना माल साठविण्यासाठी वखार महामंडळाची सोय, बाजार समिती मार्फत शेतमालाच्या उतरत्या किंमतीमुळे शेतमाल तारण कर्जाची सोय जनावरे बांधन्यासाठी लोखंडी खुंट्या, तसेच जनावरे बांधन्यासाठी निवारा शेड आहेत. शेंळ्या मेंढ्यासाठी स्वंतत्र व्यवस्था केलेली आहे. तसेच संस्थेचा मिरज पंढरपुर रोड वर HP कंपनीचा पेट्रोल डिझेल व CNG पंप चालू आहे.
मा.आमदार.डॉ.भाई कै.गणपतरावजी देशमुख साहेंब यांचे मार्गदर्शनाखाली शेतकरी अडचणीमध्ये असताना दुष्काळाच्या वेळी बाजार समितीने मुक्या जनावरांसाठी शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देवून सन 2011 साली चारा डेपो सुरु केले होते. सन 2019 मध्ये कोल्हापुर व सांगली जिल्हात पुरस्थिती निर्माण झाली त्यावेळी संस्थेने आर्थिक मदत केलेली आहे. त्याच बरोबर कोरोनासारख्या जगभर वेढा घातलेल्या महामारी रोगाने मानवी जिवनाला कलाटणी दिली अशा परस्थितीत मजुरांना दोन वेळचे अन्न हि मिळत नव्हते. त्यावेळी जिवनाआवश्यक वस्तूंचे किट 2103 कुटुंबाना घरपोच केले .
कार्य
- बाजार आवारात शेतीमाल खरेदी-विक्री व्यवसायासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवणे.
- शेतकर्यांच्या शेतीमालाविषयी हित संरक्षण करणे
- शेतीमालाची उघड लिलाव पद्धतीने विक्री करणे.
- बाजार आवारात विक्रीस आलेल्या शेतीमालाचे चोख वजनमाप करणे.
- शेतकर्यांना शेतीमाल विक्रीचे २४ तासात पैसे मिळवून देणे.
- विवादाची विनामुल्य तड़जोड़ करणे.
- शासनाने निश्चित केलेल्या शेतीमालाच्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी भावात शेती मालाची खरेदी-विक्री व्यवहार होणार नाहीत याची दक्षता घेणे.
- शेतीमालाची प्रत व दर्जा वाढविण्यासाठी शेतकर्यांना उत्तेजित करणे.
- आड़ते / व्यापारी, हमाल, तोलणार, मदतनीस, प्रक्रियाकार यांना अनुज्ञाप्ती देणे, अनुज्ञाप्ति नुतनीकरण करणे, रद्द करणे इ.
- बाजार समिती कायदा व नियमातील तरतुदीनुसार अनुज्ञाप्तीधारी यांच्या हिशोबाच्या नोंदवह्या व अनुषंगिक कागदपत्रांची तपासणी करणे व हिशोब / बिलपट्ट्या प्रमाणित करणे.
